लोकसभेत फोटो घेण्यास मनाई
नवी दिल्ली, दि. 26 – आज लोकसभेतील प्रेक्षकांच्या गॅलरीत बसून परदेशीय शिष्टमंडळातील एक इसम फोटो घेत होता, ही गोष्ट स्पीकरांचे नजरेस नजसंघाचे कचवाई यांनी आणून देताच स्पीकर धिल्ला म्हणाले, मी फोटो घेण्यासाठी परवानगी दिलेली नाही, परदेशी शिष्टमंडळाचे सभासद लोकसभेत येतात तो आम्हाला बहुमान वाटतो तथापि सभागृहात फोटो घेण्यास परवानगी नाही. मला वाटते की, या परदेशीय गृहस्थाला लोकसभेची रीत माहीत नसावी.
निवृत्त हत्तीस 500 रुपयांचे पेन्शन
कोईमतूर – वारा गालीसरच्या जंगल खात्यात 39 वर्षे सेवा करणारा एक हत्ती नुकताच सेवानिवृत्त झाला. या सेवा निवृत्तीबरोबर त्याला 500 रुपयांचे मासिक पेन्शन सुरू करण्यात आले आहे. सदर हत्तीस कामावर असताना 1000 रु. मासिक वेतन मिळत होते. या वेतनाचा खर्च त्याच्या जेवणासाठी व औषधपाण्यावर होत असे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना “शॉप ऍक्ट’ हवा
पुणे – पुणे शहरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा एक मेळावा काल भरला होता. एक मे पासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना “शॉप ऍक्ट’ लागू झाला आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या मागणीसाठी रुग्णालयासमोर निदर्शने करावीत असे ठरले.
“घेराव’ हा तहकुबीचा विषय होऊ शकत नाही
नागपूर – पुरवठा मंत्री ना. वर्तक यांना अमरावतीत घेराव घालण्यात आला होता, याबाबत विधानसभेत तहकुबी सूचना मांडण्यास सभापती वानखेडे यांनी परवानगी नाकारली. वानखेडे म्हणाले, घेराव हा तहकुबीचा विषय होऊ शकत नाही.