आदिवासींच्या बोली भाषेत क्रमिक पुस्तके
पुणे, दि. 8 – आदिवासी मुलांना त्यांच्या बोली भाषेतून शिक्षण दिल्यास ते लवकर आत्मसात होईल म्हणून महाराष्ट्र शासन आदिवासींच्या बोली भाषांतून क्रमिक पुस्तके तयार करीत आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री प्रतिभा पाटील यांनी दिली.
सुरुवातीला वारली, माडिया व कोलाम या आदिवासी बोली भाषांतून पहिल्या व दुसऱ्या इयत्तेसाठी लागणारी क्रमिक पुस्तके प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाचा आधार घ्या
मुंबई – दारिद्य्र, आजारीपण, दैन्यावस्था व असमानता या आमच्या मूलभूत समस्या असून त्या सोडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांचा आधार घेणे अत्यावश्यक आहे, यावर माझा पूर्ण भरवसा आहे, असे उद्गार केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. प्रतापचंद्र चुंदर यांनी काढले.
रक्षणासाठी हवाई दल सज्ज
नवी दिल्ली – देशाचे रक्षण करण्यासाठी हवाई दल पुरेसे सज्ज आहे, असे एअर चीफ मार्शल म्हणाले.