सरकारी नोकरांना 50व्या वर्षी निवृत्त होता येईल
नवी दिल्ली, दि. 6 – पन्नास वय झाल्यानंतर जर एखाद्या सरकारी नोकराला सेवानिवृत्त व्हायचे असले, तर त्यासाठी सरकारची लेखी परवानगी घेण्याची जरुरी नाही, असा निर्णय आज सुप्रीम कोटार्न दिला आहे. दिब्रुगढचे डि. ऍड. सेशन्स जज्ज दिनेश संगमा यांना 2 ऑगस्ट 1976 मध्ये सेवानिवृत्त व्हावयाचे होते. परंतु आसाम हायकोर्टाने त्यांनी सेवानिवृत्त व्हावे, असा निर्णय दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टाने फिरविला. आसाम सरकारचा हुकूमही याबाबत रद्द करण्यात आला आहे. 50 वर्षांचे झाल्यावर सेवानिवृत्त होण्याचा हक्क रद्द होणार नाही.
नगरसेवकांचे मानधन रद्द करावे
पुणे – पुणे महापालिकेतील सदस्यांचे मानधन रद्द करावे, अशी मागणी करणारा ठराव एका सभासदाद्वारे उद्या मांडला जाणार आहे. यापूर्वी मानधन कमी करण्याच्या संदर्भात आणखी एका सभासदाद्वारे ठराव दिला होता. त्यावेळी अनेक सदस्य नाराज झाले होते. त्यामुळे हा ठराव मंजूर होऊ नये यासाठी निकराचे प्रयत्न होतील, असे दिसते. महानगरपालिकेत ज्या सदस्याचे नातेवाईक नोकरीस आहेत, अशा सदस्यांनी राजीनामे द्यावेत अशीही मागणी एका ठरावाद्वारे केली आहे. हा ठराव बहुधा दाखल होणार नाही, असे समजते.