मंगळावर जीवसृष्टीची शक्यता नाही?
पासाडेना, कॅलिफोर्निया, दि.1 – व्हायकिंग-2 या यानाने नुकत्याच पाठविलेल्या मोहिमेत मंगळावर संद्रिय पदार्थ सापडले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी सापडण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
माणसाला माहीत असलेली जीवसृष्टी कार्बनच्या सूक्ष्म कणांशिवाय अस्तित्वात असणे शक्य नाही. व्हायकिंग-2 यानाने मातीची पहिली परीक्षा केली. तिची माहिती येथे आली आहे.
दूरदर्शनवर क्रिकेटचे थेट प्रेक्षपण
नवी दिल्ली – मुंबई व मद्रास येथे भारत व न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांची दृश्ये दूरचित्रवाणीवर पाहावयास मिळतील. सामना चालू असतानाच तो दूरदर्शनवर प्रसारित केला जाईल. न्यूझीलंडचा संघ मुंबई, मद्रास व कानपूर येथे कसोटी सामने खेळणार आहे.
अधिकाधिक लोकांना सामना दूरदर्शनवर पाहता यावा म्हणून सार्वजनिक सेटस्ही बसविण्यात येणार आहेत. तसेच या सर्व सामन्यांची निवडक दृश्ये इतर केंद्रावरूनही प्रसारित करण्यात येतील.