पुणे – शालेय शिक्षण विभागातील राज्यभरातील विविध कार्यालयांत काम करणाऱ्या मुख्य लिपिक, सहायक अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापरीक्षक या संवर्गातील 44 कर्मचाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती मिळणार आहे. याबाबतची निवडसुचीही शासनाने मंजूर केली.
सेवा ज्येष्ठतेनुसार टप्प्याटप्प्याने पदोन्नत्या देण्यात येतात. याबाबत दरवर्षी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता असते. पदोन्नत्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्याची कसरही कर्मचारी सोडत नाहीत. यासाठी स्पर्धा लागलेली असते.
राज्यातील 55 कर्मचाऱ्यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून पदोन्नत्या देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यातील 44 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरवले आहे. त्यांच्याकडून बंधपत्राद्वारे महसूल विभागाची पसंती घेऊन ती शासनाकडे सादर करण्याच्या सूचना अवर सचिव दीपक शेलार यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना दिल्या.