पिंपरी, (प्रतिनिधी) – शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने घडलेल्या दोन घटनांमध्ये एकूण 38 लाख 16 हजार 959 रुपयांची फसवणूक केली आहे. वल्लभनगर येथील घटनेत एका महिलेची व 14 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत घडली. त्यानुसार मरीलेना (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत संतोष नवनाथ कदम (वय 42, रा. भुजबळ चौक, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यानुसार अनुराग ठाकूर, कौशल शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी कदम यांना शेअर मार्केट मध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर कदम यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांना एक लाख 15 हजार रुपये परत दिले. उर्वरित 24 लाख 15 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.