पुणे – दिवसभरात 338 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यांचा समावेश करून बाधितांची संख्या आता 1 लाख 72 हजार 897 झाली आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या मात्र कमी होत नसून ती चारशेपेक्षा जास्तच आहे.
करोनाबाधितांची संख्या तीनशेच्या आसपासच होत आहे. काही दिवसांपूर्वी ती दीडशे-पावणेदोनशेच्या घरात होती. मात्र, ती दुप्पट झाली असली तरी ती मोठ्या प्रमाणात वाढताना सद्यातरी दिसत नाही.
दिवसभरात 317 जणांना डिस्चार्ज दिला असून, एकूण बाधितांमधील 1 लाख 63 हजार 296 रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव रुग्ण 5,087 आहेत.
अत्यवस्थ रुग्णांची संख्या 411 असून त्यातील 245 जण व्हेंटिलेटरवर आहेत. नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पाचजण पुण्याबाहेरील आहेत. एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4,514 झाली आहे.