नवी दिल्ली – इस्रायली फौजांकडून गाझामध्ये ३ ओलिसांची हत्या करण्यात आली आहे. गाझा शेजारच्या शेजाइय्या येथे हमासच्या दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेल्या संघर्षादरम्यान हे ३ ओलीस म्हणजे इस्रायलच्या सैन्यासाठी धोका असल्याचा गैरसमज झाल्यामुळे इस्रायली सैनिकांनी या ३ ओलिसांना गोळ्या घातल्या, मात्र हे तिघेही प्रत्यक्षात इस्रायलचेच हमासने अपहरण केलेले नागरिक होते. मात्र त्याचा उलगडा थोड्याच वेळाने झाला. ही चूक झाल्याचे इस्रायलच्या सर्व पातळ्यांवरील अधिकाऱ्यांना कळवण्यात आली आहे.
या तिघांपैकी योताम हियाम आणि अलोन शामरिया या दोघांना किबुत्झ फार अझा येथील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी पळवून नेण्यात आले होते. तर समेर अल तालालक्वा यांना किबुत्झ निर अम येथील हल्ल्याच्यावेळी पळवून नेण्यात आले होते.
पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी ही चूक भयंकर असल्याचे आणि यामुळे आपल्याला असह्य वेदना झाल्याचे म्हटले आहे. या तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशाला तीव्र दुःख झाले असून ओलिसांच्या नातेवाईकांप्रती आपल्या सहवेदना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.