प्रतापगड – भाजपचे प्रतापगड येथील खासदार संगमलाल गुप्ता यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे माजी खासदार प्रमोद तिवारी आणि त्यांच्या अन्य 26 समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्वता संगमलाल गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. गुप्ता भाजपच्या पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
भाजपचे खासदार गुप्ता हे गरीब कल्याण मेळ्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले प्रमोद तिवारी आणि त्यांच्या कन्या आमदार आराधना मिश्रा तसेच त्यांच्या अन्य समर्थकांनी खासदार गुप्ता यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. आमदार अनुराधा मिश्रा यांनीही आपल्या शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली असा आरोप गुप्ता यांनी केला आहे.