उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर

पुणे – जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यांनी दिली.

कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, व्याख्यात्या सुषमा अंधारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, ऍड. शार्दुल जाधवर यांसह आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

ऍड.शार्दुल जाधवर म्हणाले, आशाताई पवार यांनी स्वत: शेतीची काम देखील केली आहेत. अजित पवार यांच्या रुपाने त्यांनी एक रत्न महाराष्ट्राला दिले. अजित पवार यांच्या कार्यामागे त्यांच्या मातोश्रींचे अमूल्य योगदान व मार्गदर्शन आहे. त्यामुळे यावर्षी त्यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.