मुंबई – कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्ररकरणात एनसीबीने अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खानला अटक केली होती. या प्रकरणामुळे एनसीबी आणि माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले होते. यामुळे या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता.
या प्रकरणात आता मुख्य तपास अधिकारी आणि एनसीबी गुप्तचर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्य तपास अधिकारी विश्व विजय सिंह आणि आशीष रंजन प्रसाद अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालानंतर करण्यात आली आहे.
आर्यन खान प्रकरणाची चौकशी एनसीबी दक्षता पथकाकडून सुरु आहे. या पथकाच्या अहवालानंतर आर्यन खान प्रकरणात तपास करणारे मुख्य तपास अधिकारी विश्व विजय सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशीष रंजन प्रसाद यांनी भूमिका संशयित आढळली आहे.