आग्रा – आग्रामध्ये कथित विषारी दारुच्या सेवनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या विषारी दारुच्या सेवनामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 6 जणांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधले जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी 6 हवालदार आणि तिघा ठाणे अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे.
दोषी सीमा शुल्क अधिकारी आणि पोलिसांवर कारवाई करण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे, असे आग्र्याचे अतिरीक्त पोलीस महासंचालक राजील कृष्ण यांनी सांगितले. फॉरेन्सिक तपासणीमध्ये मरण पावलेल्या चौघांच्या शरीरामध्ये मिथाईल अल्कहोलचे अंश सापडले आहेत. त्यामुळे या चौघांचा मृत्यू विषारी दारुच्या सेवनामुळे झाला असल्याचे स्पष्ट होते आहे, असे त्यांनी सांगितले.