शिक्रापूर(पुणे)- पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरसह परिसरात गुरुवारी (दि. 27) तब्बल 50 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
शिक्रापूर येथे 20, तळेगाव ढमढेरे येथे 11, सणसवाडी येथे 7, कोरेगाव भीमा येथे 10, शिवतक्रार म्हाळुंगी येथे एक तर विठ्ठलवाडी येथे एक असे तब्बल 50 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोनाबाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केले आहे. सर्व करोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे.