पिंपरी – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिकांना कोणतेही बिल न देता औषध देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देहू-आळंदी रोडवरील चिखली येथे बुधवारी (दि. 19) घडली.
किरण रामहरक जैस्वाल / रोहिदास (रा. मनपा शाळेजवळ, नेहरुनगर, पिंपरी), प्रकाश रामलाल चौधरी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) आणि ारायण राठोड (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन अशोक कांबळे (वय 44, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी रविवारी (दि. 23) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विना खरेदी बिलाने औषध खरेदी केले. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते औषध ग्राहकांना कोणतेही बिल न देता विक्री केले. पोलीस उपनिरीक्षक देशमुख याबाबत अधिक तपास करीत आहेत.