बॉलिवूडची आघाडीची कलाकार करीना कपूरला बॉलिवूडमध्ये 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता करीनाला वाटते आहे की ती पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. करीनाने तिच्या कारकीर्दीत पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका 2004 साली फिदा चित्रपटात साकारली होती.
फिदा चित्रपटात करीनाने अशा महिलेची भूमिका साकारली होती जी आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी एका व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. या चित्रपटात करीनासोबत शाहिद कपूर व फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. याच बरोबर करीनाने हिरॉईन चित्रपटातही निगेटिव्ह भूमिका
चांगल्याप्रकारे साकारली होती.
लॅक्मे फॅशन वीक 2019मध्ये बोलताना करीना कपूरने सांगितले की, जर भूमिका चांगली असेल तर निगेटिव्ह भूमिका साकारण्याची मला इच्छा आहे. तर, आपल्या आगामी गुड न्यूज चित्रपटाबद्दल करीनाने सांगितले की, हा चित्रपट एण्टरटेनिंग आहे. मला वाटते की हा एक मजेशीर व उत्साही सिनेमा आहे. या चित्रपटाचे कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूप हसतील याचा मला विश्वास आहे. या चित्रपटात करीनाशिवाय दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 27 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.