- 25 वर्षीय तरुणीला करोनाची लागण
- एकूण रुग्णसंख्या 62
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील आणखी एका तरुणीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 62 झाली आहे. या तरुणीचा तपासणी अहवाल रविवारी (दि. 19) सकाळी आला. त्यामध्ये ती करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णामध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी एकाच दिवशी सात करोनाबाधित रुग्ण सापडले. तर आज पुन्हा एका 25 वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 39 आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर उर्वरित सात रुग्णांवर पुणे शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका रुग्णावर जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहरात आजपर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सातत्याने शहरातील करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत भर पडत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.