सराफाच्या दुकानात सव्वासतरा लाखांची चोरी

पिंपरी – सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 17 लाख 27 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी चिंचवड येथे उघडकीस आली.

चंपालाल हुक्‍माराम चौधरी (वय 39, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी चौधरी यांचे गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी येथे “बालाजी ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटले. आतील एक लाख 75 हजार रुपयांचे 55 ग्रॅम सोन्याचे आणि 14 लाख 87 हजार 500 रुपयांचे 42 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे असे एकूण 17 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला.

Leave A Reply

Your email address will not be published.