अबब.. तब्बल साडे नऊ किलोचे रताळे

लोणी धामणी-जारकडवाडी (ता. आंबेगाव ) येथील ज्ञानेश्वर वस्तीतील सुनील आनंद लबडे यांच्या शेतात तब्बल साडेनऊ किलोचे रताळे निघाले आहे. लबडे यांनी आपल्या घराच्या जवळच असणाऱ्या शेतात सहा महिन्यांपूर्वी रताळेचे वेल लावले होते. एकादशीच्या निमित्ताने उपवासासाठी रताळे खोदण्यासाठी गेले असता मोठ्या आकाराचे रताळे निघाले. त्याचे वजन केले असता ते तब्बल साडे नऊ किलो भरले. हे रताळे पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.