पुणे,दि.18- एका विवाहित महिलेबर बलात्कार करुन तीच्या लहान मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी एका तरुणाविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम पाटील(25,रा.सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व आरोपी एकाच सराफी दुकानात कामाला आहेत. आरोपीने फिर्यादीस तु माझ्या सोबत रहा असा सतत तगादा लावला होता. यांनतर त्याने तीच्याशी शेवळवाडी येथील एका सदनिकेत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. बलात्कार केल्यानंतर नवऱ्याला सांगितलेस तर तुझ्या लहान मुलीला पळवून तीच्यावरही बलात्कार करेल अशी धमकी दिली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बांबे करत आहेत.