‘एन. चंद्रबाबू नायडू -शरद पवार’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

नवी दिल्ली – तेलगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या भेटीनंतर राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.  एन. चंद्रबाबू नायडू  आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. पण भेटीत नेमकी काय चर्चा झाली , हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

तत्पूर्वी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषण केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुध्दा नायडू यांना ट्विटद्वारे समर्थन दिले होते की, ‘आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्रबाबू नायडू करत आहेत, यास मी पाठिंबा दिला आहे’. केंद्र सरकारविरोधात त्यांनी पुकारलेल्या युध्दात महाआघाडीसुध्दा सोबत असल्याचे शदर पवार यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)