भवानीनगरात अवैध धंदे; पोलीसांच्या कामाबाबत नाराजी

कारवाई करण्याची नागरकांची मागणी

भवानीनगर- भवानीनगर व परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याने भवानीनगर दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या भागातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे, अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भवानीनगर (ता. इंदापूर) भागात कायम वर्दळ सुरु असते. येथे व्यापारपेठ असल्याने श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिक व महिला कायम बाजार व भाजी मंडई खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु, याच भागात काही ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याने विनाकारण नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याच प्रमाणे भवानीनगर दूरक्षेत्राच्या हद्दीतही अनेक अवैध धंदे सुरु असल्याने ते बंद करावेत, अशी नागरिक मागणी करीत आहेत.

भवानीनगर हे या भागातील केंद्रस्थान असल्याने या ठिकाणचे वातावरण भितीमुक्त असावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु, येथील पोलीस यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीसांनी याची दखल घेऊन, अशा बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)