पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक

कराड – विद्यानगर (सैदापूर), ता. कराड येथे नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान हॉटेल देवीप्रसादच्या समोर रेकॉर्डवरील गुन्हेगार रिव्हॉल्वर घेऊन फिरत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्यास अटक केली. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याच्याकडून सुमारे 40 हजार रुपये किमतीचे देशी बनावटी रिव्हॉल्वर ताब्यात घेण्यात आले. धनंजय मारूती वाटकर (वय 21 रा. विद्यानगर, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरूवारी रात्री विद्यानगर, ता. कराड येथे फरार आरोपी अमित हणमंत कदम याचा शोध घेण्याकरीता विद्यानगर परिसरात नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार धनंजय वाटकर हा हॉटेल देवीप्रसादच्या समोर कमरेस रिव्हॉल्वर लावून उभा आहे. पोलिस त्याच्याजवळ गेले असता धनंजय हा पोलिसांना पाहून कावरा बावरा होऊन पळू लागला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडून त्याचे नाव गाव विचारले असता धनंजय वाटकर असल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेचे पाठीमागे पॅन्टचे आतील बाजूस सुमारे 40 हजार रूपये किंमतीचे देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चंदनशिव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)