पुणे – ग्रामीणमधील लसीकरणाचा वेग वाढावा. लस न घेतलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी ही शोधमोहीम सुरू करून लसीकरण करण्यात येणार आहे.
करोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गावातील स्थलांतरीत, मृत, लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेल्यांची वर्गवारी तयार करावी. गावनिहाय मोहीम राबविताना ज्या व्यक्तींनी अद्याप लस घेतली नाही, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना लस देण्याची विशेष मोहीम राबविण्यात यावी,
असा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यानुसार तालुका आरोग्य प्रमुख यांना सूचना दिल्या. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, हे लसीकरण तात्काळ करून मोहिमेची अंमलबजावणी करावी, अशा विभागाच्या सूचना आहेत.