Yash Dayal : यश दयाल पुन्हा अडचणीत; क्रिकेटच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत FIR दाखल

Yash Dayal Faces New Rape Allegations : क्रिकेटर यश दयाल याच्यावर आणखी एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. यामुळे तो पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. नवीन प्रकरणानुसार, जयपूरच्या सांगानेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाली आहे. तक्रारदार तरुणीने सांगितले की, यश दयालने तिला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचे आमिष दाखवले आणि भावनिक ब्लॅकमेल करत सुमारे दोन वर्षे तिच्यावर बलात्कार केला.
तक्रारीनुसार, ती क्रिकेट खेळत असताना यश दयालच्या संपर्कात आली होती. दोन वर्षांपूर्वी, जेव्हा ती अल्पवयीन होती, तेव्हा जयपूरमध्ये यश दयालशी तिची भेट झाली. त्यावेळी तो आयपीएल सामना खेळण्यासाठी जयपूरला आला होता. तरुणीच्या म्हणण्यानुसार, यश दयालने क्रिकेटच्या टिप्स देण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलमध्ये बोलावले.
पीडित मुलगी १७ वर्षांची अल्पवयीन होती –
Another R*pe case has been filed against Yash Dayal… pic.twitter.com/spOi8ghCGr
— RVCJ Media (@RVCJ_FB) July 25, 2025
आयपीएल २०२५ दरम्यान सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. यापूर्वी, पीडित मुलगी १७ वर्षांची अल्पवयीन होती, जेव्हा तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला होता. अशा परिस्थितीत, पोलिसांनी यश दयालविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर देखील नोंदवला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, धोनीला मागे टाकत बनला नंबर वन!
पहिला एफआयआर कुठे दाखल करण्यात आला होता?
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळणाऱ्या क्रिकेटपटू यश दयालविरुद्ध जुलैमध्ये एका युवतीने लैंगिक शोषण केल्याबद्दल एफआयआर दाखल केली होती. गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलिस स्टेशनमध्ये ही एफआयआर नोंदवण्यात आली होती. युवतीने यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने WTC मध्ये रचला इतिहास, बोटाला फ्रॅक्चर असतानाही मोडला हिटमॅनचा विक्रम
कोण आहे यश दयाल?
यश दयाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल २०२५ च्या विजेतेपदाचा संघाचा सदस्य आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत. तो २०२२ मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सदस्य देखील आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो.





