Yash Dayal Case : ‘पाच वर्षे कोणी मूर्ख बनू शकत नाही…’, यश दयालला लैंगिक शोषण प्रकरणात कोर्टाचा दिलासा

Yash Dayal Gets Interim Relief in Sexual Assault Case : अलाहाबाद उच्च न्यायालयाने क्रिकेटपटू यश दयाल याला लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. 27 वर्षीय यश दयाल याच्यावर एका युवतीने लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात 6 जुलै रोजी गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलीस स्टेशनमध्ये बीएनएसच्या कलम 69 अंतर्गत FIR दाखल झाली होती.
पुढील सुनावणीपर्यंत यशला मिळाला दिलासा –
न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ती अनिल कुमार यांच्या खंडपीठाने यश दयाल याला पुढील सुनावणीपर्यंत दिलासा दिला आहे. न्यायालयाने कथित शोषणाच्या कालावधीबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालय म्हणाले, “एखाद्याला एक दिवस, दोन दिवस किंवा तीन दिवस फसवले जाऊ शकते, पण पाच वर्षे नाही. तुम्ही पाच वर्षे रिलेशनमध्ये आहात. कोणालाही पाच वर्षे फसवता येत नाही.”
The Allahabad High Court today stayed the arrest of Cricketer Yash Dayal, who plays for Royal Challengers Bengaluru (RCB), in connection with an FIR lodged against him for allegedly sexually exploiting a woman for 5 years.
Read more: https://t.co/f1VT0CZcok#yashDayal pic.twitter.com/s7eHsZAT0r— Live Law (@LiveLawIndia) July 15, 2025
यश दयाल काय आहे आरोप?
हा खटला एका युवतीच्या तक्रारीवर आधारित आहे. त्या युवतीचा दावा आहे की, सुमारे पाच वर्षांपूर्वी ती यश दयालला भेटली होती. तिच्या म्हणण्यानुसार, दयालने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, दयालने सातत्याने लग्नाची योजना पुढे ढकलली. नंतर तिला समजले की, दयाल यांचे कथितपणे इतर महिलांशीही संबंध होते. आता यश दयालच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल स्वरूप चतुर्वेदी यांनी बाजू मांडली. त्यांना वकील गौरव त्रिपाठी आणि रघवंश मिश्रा यांनी सहाय्य केले.
हेही वाचा – Olympics 2028 मधील क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर! कधी आणि कुठे होणार सामने? जाणून घ्या
‘पाच वर्षे कोणाला मूर्ख बनवता येईल का?’
एफआयआर बीएनएसच्या कलम 69 अंतर्गत नोंदवण्यात आली होती. हे कलम फसवणुकीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याशी संबंधित आहे. हायकोर्टाने दिलेल्या अंतरिम संरक्षणामुळे पुढील सुनावणीपर्यंत दयालला अटक होणार नाही. कोर्टाने या प्रकरणात काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, जर कोणी व्यक्ती पाच वर्षे एखाद्या नात्यात असेल, तर त्याला इतका दीर्घकाळ मूर्ख बनवणे शक्य नाही. कोर्टाच्या मते, ही बाब विचार करण्यासारखी आहे की, ती युवती पाच वर्षे फसवणुकीत कशी राहिली.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडचा मास्टरप्लॅन! भारताविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी संघात मोठा बदल
बीएनएसच्या कलम 69 नुसार, जर कोणी व्यक्ती फसवणुकीने एखाद्या महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल, तर त्याला या कलमांतर्गत दोषी ठरवले जाते. या प्रकरणातही याच कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. कोर्टाने यश दयालला अंतरिम संरक्षण दिले आहे, म्हणजेच पुढील सुनावणीपर्यंत पोलिस त्याला अटक करू शकणार नाहीत. ही एक दिलासादायक बाब आहे, पण पुढे काय होईल हे पाहणे बाकी आहे.





