IND vs ENG : ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, धोनीला मागे टाकत बनला नंबर वन!

IND vs ENG Rishabh Pant break MS Dhoni Record : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत एकामागून एक अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी नुकतेच त्याने अर्धशतक झळकावून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. या अर्धशतकासह त्याने इंग्लंडमध्ये ९ अर्धशतके पूर्ण केली आणि असे करणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. यासह त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले.
ऋषभने धोनीला टाकले मागे –
एमएस धोनीने इंग्लंडच्या भूमीवर १२ कसोटी सामने खेळताना ८ अर्धशतके झळकावली होती. मात्र, पंतने आपल्या १३व्या सामन्यात धोनीचा हा विक्रम मोडला. गुरुवारी (२४ जुलै २०२५) ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना २७ वर्षीय या डावखुऱ्या फलंदाजाने ७६ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी साकारली. या अर्धशतकासह त्याने धोनीला मागे टाकत इंग्लंडमध्ये ९ अर्धशतकांचा टप्पा गाठला.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत केला खास पराक्रम-
A standing ovation for Rishabh Pant at Old Trafford after he came out to bat despite an injury 👏#WTC27 | #ENGvIND pic.twitter.com/W1W2gwuY48
— ICC (@ICC) July 24, 2025
अँडरसन-तेंडुलकर करंडकाच्या या हंगामात पंतने पाचव्यांदा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली, जो भारतीय यष्टिरक्षकांमध्ये कसोटी सामन्यांतील सर्वोच्च कामगिरी आहे. यापूर्वी धोनी (२००८-०९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध दोनदा) आणि फारुख इंजिनिअर (१९७२-७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध) यांनी प्रत्येकी चार वेळा ही कामगिरी केली होती.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने WTC मध्ये रचला इतिहास, बोटाला फ्रॅक्चर असतानाही मोडला हिटमॅनचा विक्रम
ऋषभ पंतची दुखापतीनंतरही विक्रमी कामगिरी –
विशेष म्हणजे, पंतने हे दोन्ही विक्रम दुखापतीनंतर केले. सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या चेंडूने त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्याला गाडीतून मैदानाबाहेर नेण्यात आले होते. तपासणीत त्याच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आणि त्याला ६ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.
हेही वाचा – Bengaluru Stampede : RCB वर बंदीची टांगती तलवार; चेंगराचेंगरीमुळे कर्नाटक सरकारचा कठोर निर्णय
मात्र, तरीही बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला फलंदाजीची परवानगी दिली आणि पंतने दुखापतीवर मात करत अर्धशतक झळकावले. पंत आपल्या धडाकेबाज खेळीने आणि जिद्दीने भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टिरक्षकांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.





