IND vs ENG : ऋषभ पंतने WTC मध्ये रचला इतिहास, बोटाला फ्रॅक्चर असतानाही मोडला हिटमॅनचा विक्रम

IND vs ENG Rishabh Pant break Rohit Sharma record : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. ज्यामुळे ३७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर त्याच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले, ज्यामध्ये त्याच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. तरीही, जेव्हा दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकुरच्या विकेटनंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता, तेव्हा पंतने अप्रतिम जिद्द दाखवली आणि फलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला.
रोहित शर्माचा मोडला विक्रम –
ऋषभ पंत जेव्हा मैदानात परतला, तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांनी त्याचे स्वागत केले. त्याने आपल्या धावांमध्ये १७ धावांची भर घातली आणि शानदार अर्धशतक पूर्ण केले. त्याने पहिल्या डावात ५४ धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला. पंतने डब्ल्यूटीसीमध्ये आतापर्यंत २,७३१ धावा केल्या आहेत, तर रोहितच्या नावावर २,७१६ धावा आहेत. अशा प्रकारे, फ्रॅक्चर बोटासह खेळताना पंतने सर्व भारतीय खेळाडूंना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.
पंतची कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी –
#TeamIndia post 358 on the board!
6⃣1⃣ for Sai Sudharsan
5⃣8⃣ for Yashasvi Jaiswal
5⃣4⃣ for vice-captain Rishabh PantUpdates ▶️ https://t.co/L1EVgGtx3a#ENGvIND | @sais_1509 | @ybj_19 | @RishabhPant17 pic.twitter.com/4GFLPG3T9U
— BCCI (@BCCI) July 24, 2025
ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतके ठोकली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतके केली. चौथ्या कसोटीत दुखापतीनंतरही त्याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. पंतने २०१८ मध्ये भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने ४७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३,४२७ धावा केल्या असून, यामध्ये ८ शतकांचा समावेश आहे.
हेही वाचा – Bengaluru Stampede : RCB वर बंदीची टांगती तलवार; चेंगराचेंगरीमुळे कर्नाटक सरकारचा कठोर निर्णय
भारतीय संघाचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला –
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला मजबूत सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. केएल राहुलने ४६, तर जैस्वालने ५८ धावा केल्या. यानंतर कर्णधार गिल १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकुर (४१ धावा) आणि ऋषभ पंत (५४ धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघ ३५८ धावांपर्यंत पोहोचू शकला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.





