अकलूज, (प्रतिनिधी)- शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 9 लाख 71 हजार 171 व्या साखर पोत्याचे पूजन मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते झाला.
तसेच बगॅसवर आधारीत 33 मे. वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आतापर्यंत एक्स्पोर्ट (विक्री) केलेल्या 4 कोटी 55 लाख 55 हजार 555 वीज विक्री युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार यांचे हस्ते झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर बाटचाल करीत आहे. कारखान्याचा सिझन 2023-24चा ऊस गळीत हंगाम 1 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु झाला 12 मार्चअखेर 9 लाख 86 हजार 100 मे. टन ऊसाचे गाळप होऊन 9 लाख 60 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले तर साखर उतारा सरासरी बी-हेवीसह 10.76 टक्के आहे.
चालू सिझन 2023-24 मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प 28 ऑक्टोबर 2023 रोजी सुरु झाला असून 12 मार्चअखेर त्यामध्ये वीज 7 कोटी 97 लाख 43 हजार 918 युनीट निर्माण झाली. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये 12 मार्चअखेर बी-हेवी पासून 1 कोटी 29 लाख 68 हजार 517 लिटर्स व सी-हेवी पासून 11 लाख 71 हजार 479 लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच बी-हेवी पासून 1 कोटी 22 लाख 32 हजार 660 लिटर्स व सी-हेवी 7 लाख 78 हजार 786 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे.
अॅसेटीक अॅसिड प्लॅटमध्ये 259.500 मे. टन अॅसिटाल्डीहाईड व 287.800 मे. टन अॅसिटीक अॅसिडची निर्मिती झाली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार,, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत- पाटील, संचालिका सुजाता शिंदे,
राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक तसेच माजी संचालक भिमराव काळे, रामचंद्र चव्हाण, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, केशव ताटे, महादेव घाडगे, चांगदेव घोगरे, विठ्ठल ताटे तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख, खातेप्रमुख तसेच कामगार उपस्थित होते.