वॉशिंग्टन – कोणाचे भाग्य कसे उजाडेल आणि कोणाला कशी लॉटरी लागेल याबाबत काहीच अंदाज व्यक्त करता येत नाही अमेरिकेतील एका महिलेबाबत नुकतीच अशी घटना घडली आहे एका भंगारच्या दुकानातून तिने फक्त चार डॉलरला म्हणजे भारती रुपया नुसार ३०० रुपयाला खरेदी केलेल्या एका रंगीबेरंगी फुलदाणीला लिलावामध्ये तब्बल एक लाख डॉलर पेक्षा जास्त किंमत मिळाल्याने तिला लॉटरी लागली आहे,
जेसीका व्हिन्सेंट असे या महिलेचे नाव असून तिने काही महिन्यापूर्वी जुन्या वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानातून फक्त चार डॉलरला ही रंगीबेरंगी फुलदाणी खरेदी केली होती, त्यानंतर या फुलदाणीचे छायाचित्र तिने फेसबुकवर प्रसारित केले नंतर तिला ज्या कॉमेंट्स मिळाल्या त्यापैकीच काही कॉमेंट्स ही फुलदाणी अतिशय दुर्मिळ असून त्याला मोठी किंमत मिळू शकते.
अशा प्रकारच्या होत्या कॉमेंट्स करणाऱ्या काही लोकांनी ही फुलदाणी जास्त किमतीला खरेदी करण्याची तयारीही दाखवली नंतर जेसीकाने काही तज्ञांची मदत घेतली आणि या फुलदाणीची पाहणी केली तेव्हा ती अतिशय दुर्मिळ आणि वेगळ्या प्रकारे तयार करण्यात आलेली काचेची फुलदाणी असल्याचे लक्षात आले म्हणून तिने लिलाव करणारे एका कंपनीशी संपर्क साधला त्या कंपनीने तिची फुलदाणी लिलावासाठी स्वीकारली आणि जेव्हा या फुलदाणीचा लीलाव झाला तेव्हा ती तब्बल एक लाख 7000 डॉलरला विकली गेली एखादी लॉटरी लागल्यावर जी भावना तयार होते तीच भावना माझ्या मनात निर्माण झाली अशी प्रतिक्रिया नंतर जेसीकाने व्यक्त केली.