Epstein File India | उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे ‘एपस्टीन फाईल्स’ मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हणत थेट भारताचे पंतप्रधान बदलणार असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज 19 डिसेंबर 2025 रोजी जगप्रसिद्ध जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील सर्व गोपनीय माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याने जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, ई-मेल्स, फोटो आणि संपर्कांची माहिती ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’नुसार सार्वजनिक केली जाणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाला ही कागदपत्रे उघड करण्यासाठी 19 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ‘अमेरिका हाऊस ऑफ रिप्रेंजेंटेटिव्हसच्या डेमोक्रेट्सने काही छायाचित्र सार्वजनिक केली आहे दरम्यान, अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील डेमोक्रॅट्सनी एपस्टीनच्या इस्टेटमधून 68 नवे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये बिल गेट्स, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, विचारवंत नोम चॉम्स्की, ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत. तसेच, डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि बिल गेट्स यांचेही काही फोटो समोर आले आहेत. Epstein File India | राजकीय किंवा सामाजिक संपर्कांपुरते मर्यादित नुकत्याच उघड झालेल्या ई-मेल्समध्ये 2019 साली एपस्टीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकन राजकीय रणनीतीकार स्टीव्ह बॅनन यांच्याशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी, भाजप नेते मंत्री हरदीपसिंग पुरी आणि भारतीय वंशाचे लेखक दीपक चोप्रा यांची नावेही संदर्भ म्हणून आढळतात. मात्र, हे सर्व संदर्भ राजकीय किंवा सामाजिक संपर्कांपुरते मर्यादित आहेत. भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दावा केला आहे की, एपस्टीन फाईल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे आहेत. या खुलाशांमुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि नागपूरमधील व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल, असा दावा त्यांनी केला. मात्र आज एपस्टीन फाईल्समधील खुलासे समोर येत असतानाच आता पृथ्वीराज चव्हाणांचे दावे खरे ठरणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Epstein File India | हेही वाचा: बांगलादेशमध्ये पुन्हा अशांतता! कोण आहे शरीफ उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूनंतर पसरली संतापाची लाट