Osman Hadi Bangladesh | बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. २०२४च्या शेख हसीना यांच्या विरोधातील चळवळीतील प्रमुख विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याचे काल (गुरुवारी 18 डिसेंबर 2025) निधन झाले. ढाक्यात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मध्यरात्रीपासून निदर्शने, जाळपोळ सुरू झाली आहेत. २०२४ मध्ये बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनात शरीफ उस्मान हादी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो इन्किलाब मंच या संघटनेचे प्रवक्ते आणि समन्वयक होता. याच आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागले आणि त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. या क्रांतीनंतर हादी बांगलादेशातील तरुणांचे एक शक्तीशाली नेता म्हणून समोर आला होता. इंकलाब मंच या संघटनेभोवती बांगलादेशाच्या राजकारणात कायमच वादाचे वातावरण राहिले आहे. काही वेळा या संघटनेवर कट्टरपंथी विचारसरणीचा आरोप करण्यात आला. 2024 च्या विद्यार्थी आंदोलनानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने इंकलाब मंच बरखास्त केला होता आणि या संघटनेला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घातली होती. कोण आहे शरीफ उस्मान हादी ? शरीफ उस्मान हादी याचा जन्म बांगलादेशातील झलकाठी जिल्ह्यात झाला. त्याचे कुटुंब धार्मिक आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जात होते. त्याचे वडील मदरसा शिक्षक होते. वडिलांकडूनच हादीला शिस्त, अध्ययनशीलता आणि नैतिक मूल्यांचे संस्कार मिळाले. त्यानी आपले प्राथमिक आणि धार्मिक शिक्षण नेसराबाद कामिल मदरसा येथून पूर्ण केले होते. Osman Hadi Bangladesh | हादी हे या आंदोलनातील आक्रमक आणि प्रभावी वक्ता म्हणून ओळखले जात होता. आगामी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत तो ढाका-8 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होता. जुलै 2024 मध्ये झालेल्या व्यापक विद्यार्थी विद्रोहात इंकलाब मंच हे नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. Osman Hadi Bangladesh | शरीफ उस्मान हादी याच्यावर हल्ला मात्र शरीफ उस्मान हादी याच्यावर 12 डिसेंबर 2025 रोजी ढाक्यात हल्ला झाला होता. तो पलटन परिसरातील कल्व्हर्ट रोडवरून ऑटो-रिक्षाने प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळी थेट त्याच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला सिंगापूर जनरल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जिकल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. Osman Hadi Bangladesh | समर्थकांचा हा राजकीय कट असल्याचा आरोप दरम्यान, शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर ढाका तसेच इतर शहरांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्याच्या समर्थकांनी हा मृत्यू राजकीय कट असल्याचा आरोप केला असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी शहरातील काही संवेदनशील भागांत बंदोबस्त वाढवला आहे. हादी भारताकडे शत्रुत्वाने पाहत होते, त्यांनी वारंवार भारताविरोधात विधाने केली आहेत. भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. Osman Hadi Bangladesh | हेही वाचा: Antibiotics Side Effects: एंटीबायोटिक्स घेताना हे ५ नियम पाळा, औषध परिणामकारकही ठरेल आणि साइड इफेक्ट्सही टळतील