Chandrashekhar Bawankule-Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा एका कार्यक्रमादरम्यान केला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांचा थोडा बुद्धिभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही बोलण्याची सवय लागली आहे. कुठे पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतात, कोण जाणार, कोण येणार, आता जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते पृथ्वीराज चव्हाण हे झाले आहेत, असे मला वाटते.” Chandrashekhar Bawankule-Prithviraj Chavan | स्वत:ला फार त्रास करुन घेऊ नये – फडणवीस तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. “आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, त्यांना स्वप्न पडत होती हे आम्ही पाहिलेलं आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पीएमओचे मंत्री राहिले त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागला म्हणजे निश्चितच यात काहीतरी काळबेरं आहे. त्यामुळे, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच, असा विचार करुन त्यांनी स्वत:ला फार त्रास करुन घेऊ नये, असा माझा सल्ला आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. Chandrashekhar Bawankule-Prithviraj Chavan | हेही वाचा: Bigg Boss Marathi Season 6: अवघ्या महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत!