Rahul Gandhi: राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; म्हणाले, ‘तुम्ही संपूर्ण देश अमेरिकेला विकला’
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, "तुमच्या पंतप्रधानांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला भीती दिसेल. ते संसदेत येऊ शकले नाहीत, कारण घोषणा नव्हत्या, तर एपस्टीन आणि अदानी प्रकरण होते."

Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर व्हिडीओ प्रसिद्ध करत राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही देश विकला आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.”
एपस्टीन फाइल्स आणि अदानी प्रकरणावरून हल्लाबोल –
राहुल गांधी यांनी भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, “तुमच्या पंतप्रधानांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला भीती दिसेल. ते संसदेत येऊ शकले नाहीत, कारण घोषणा नव्हत्या, तर एपस्टीन आणि अदानी प्रकरण होते.” एपस्टीन फाइल्समधील ईमेलमध्ये मोदींचे नाव, त्यांच्या मंत्र्यांचे आणि मित्रांचे नाव येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदी जी, आप शर्म की बात करते हो? शर्म की बात मैं आपको बताता हूं।
Epstein files में आपका, आपके मंत्री और आपके मित्र का साथ में नाम आना, ऐसे घिनौने अपराधी के साथ आपका नाम जुड़ा होना – ये शर्म की बात है।
आपने अमेरिका के साथ जो Trade deal की है, जिसमें आपने देश को बेच दिया – ये… pic.twitter.com/fLFJf4SjNC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 23, 2026
अदानी यांच्यावर अमेरिकेत सुरू असलेल्या खटल्याने मोदींची झोप उडाल्याचे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, हा खटला भाजप आणि त्यांच्या आर्थिक रचनेवर असल्याने गेल्या १४ महिन्यांत कोणतीही कारवाई झालेली नाही.
अमेरिकेशी व्यापार करारावर आक्षेप –
अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारात भारताला काहीच मिळाले नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. “देशाचा डेटा दिला, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले, वस्त्रोद्योग बरबाद केला — हे लाजिरवाणे आहे,” असे ते म्हणाले. “अहिंसा आणि लोकशाही मार्गाने विरोध करणे हा देशाचा पाया आहे, हाच मार्ग महात्मा गांधी आणि भगतसिंग यांनी दाखवला,” असेही ते म्हणाले.
मोदींनी केली होती टीका –
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये झालेल्या निदर्शनांवरून कॉंग्रेसवर जोरदार टीका केली होती. एका जाहीर सभेत ते म्हणाले होते की, या पार्टीने एका जागतिक कार्यक्रमाला आपल्या ‘घाणेरड्या राजकारणाचा’ आखाडा बनवले.





