Whirlpool India Share Price: मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी इंट्राडे ट्रेडमध्ये, व्हर्लपूल इंडियाचे शेअर्स BSE वर 4 टक्क्यांनी घसरून 1,271 रुपयांवर आला आहे. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 3.24 टक्क्यांच्या घसरणीसह 1287.70 रुपये प्रति शेअरवर बंद झाला.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हर्लपूल इंडियाची प्रवर्तक कंपनी व्हर्लपूल मॉरिशस या आठवड्यात ब्लॉक डीलद्वारे 451 दशलक्ष डॉलर्सचा भारतीय युनिटमधील 24 टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. व्हर्लपूल इंडियामध्ये त्याच्या पॅरोट कंपनीचा 75 टक्के हिस्सा आहे. या वृत्तानंतर शेअरमध्ये घसरण होत असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
व्हर्लपूलच्या मूळ कंपनीने सोमवारच्या बंद किंमतीपेक्षा 7.6 टक्क्यांनी कमी, 1,230 रुपये प्रति समभाग हिस्सा विकण्याची तयारी केली आहे. बुधवारपर्यंत हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कर्ज कमी करण्यासाठी व्हर्लपूल हिस्सा विकणार –
कर्ज कमी करण्यासाठी भागभांडवल विकली जाणार आहे. वाढती स्पर्धा आणि किमतीच्या दबावाला सामोरे जावे लागल्याने कंपनीचा नफा सप्टेंबरच्या अखेरीस तीन महिन्यांत सलग पाचव्या तिमाहीत घसरला. अशी माहिती नोव्हेंबरमध्ये व्हर्लपूलने यूएस फाइलिंगमध्ये दिली होती.
दरम्यान, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, व्हर्लपूल इंडियाचा एकूण परिचालन महसूल 1,535.7 कोटी रुपये होता. हे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 17.9 टक्के अधिक आहे. त्याचा निव्वळ नफा 12 टक्क्यांनी वाढून 29.9 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा एबिटा 62.7 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 42.5 टक्के अधिक आहे.