नवी दिल्ली – सोने हा असा मौल्यवान धातू आहे की जगातले बहुतेक देश त्याचा साठा राखुन ठेवत असतात. करोनाच्या काळातही देशोदेशींच्या मध्यवर्ती बॅंकांनी आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला. जगात सगळीकडेच हा ट्रेंड असतो कारण बॅंकाच्या आर्थिक व्यवस्थापनात सोन्याची भूमिका महत्वाची असते.
करोनाच्या काळात सोन्याची किंमत 55 हजारापर्यंत पोहोचली होती. कोणत्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे, याबाबत वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने अहवाल जारी केला आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेउया..
अमेरिका:
जगात सगळ्यांत जास्त सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या म्हणण्यानुसार अमेरिकेकडे सध्या 8,133.5 मेट्रीक टन सोने आहे.
जर्मनी:
सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जर्मनी जगात दुसऱ्या स्थानावर आहे. त्या देशाकडे अधिकृतपणे असलेल्या सोन्याचा आकडा 3,363.6 मेट्रीक टन सोने आहे. युरापीय देशांत जर्मनीकडेच सगळ्यांत जास्त सोने आहे.
इटली:
इटलीकडे 2,451.8 मेट्रीक टन सोने आहे. युरोपीय देशांत जर्मनीनंतर सोन्याच्या साठ्याबाबत इटलीचा क्रमांक लागतो.
फ्रान्स:
फ्रान्सचा जगात चौथा तर युरोपात तिसरा क्रमांक लागतो. या देशाकडे 2,436 मेट्रीक टन सोने आहे.
वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार चीन पाचव्या तर रशिया सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही देशांकडे अनुक्रमे 1948.3 आणि 1040 मेट्रीक टन सोने आहे.
आठव्या स्थानावर असलेल्या जपानकडे 765.2 मेट्रीक टन सोने आहे.
भारताकडे 653 मेट्रीक टन सोने असून जगभरात सोन्याच्या साठ्याच्या संदर्भात आज भारत नवव्या क्रमांकावर आहे.