लखनौ – आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट झाली. आज विधानसभेत नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांचा शप्पतविधी चा कार्यक्रम होता. दरम्यान सभागृहात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव दोघंही एकमेकांसमोर आल्यावर त्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांकडे बघून हसून हस्तांदोलन केले.
योगी आणि अखिलेश यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अखिलेश यांनी योगी यांना पाहताच पुढे जाऊन योगींच्या दिशेने हात पुढे केला. यानंतर योगींनी त्यांच्या पाठीवर थाप दिली.
#WATCH Uttar Pradesh CM Yogi Adityanath meets Leader of Opposition Akhilesh Yadav in the Legislative Assembly during oath-taking of newly-elected legislators #Lucknow pic.twitter.com/7r6fX7ErjX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 28, 2022
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर सदर मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यांनी विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय करहाल मतदारसंघाचे आमदार आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. याशिवाय विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीपकुमार दुबे यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 29 मार्च रोजी दुपारी 3 वाजता विधानसभा मंडपात होणार आहे. यामध्ये विधानसभेचा कोणताही सदस्य २८ मार्च रोजी दुपारी २ वाजेपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आठ वेळा आमदार राहिलेले सतीश महाना यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाणार आहे.