Shades of Zaheer Khan | भारताला मिळाली ‘लेडी झहीर खान’, सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ…

Shades of Zaheer Khan : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी बॉलिंग करताना दिसत आहे, जीची बॉलिंग ॲक्शन भारताचा दिग्गज गोलंदाज झहीर खान सारखी हुबेहुब आहे.
खरे तर या मुलीचे नाव सुशीला मीना आहे आणि सचिन तेंडुलकर तिच्या बॉलिंग ॲक्शनने खूप प्रभावित झाला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये झहीर खानलाही टॅग केले आहे. हा लेख लिहिल्यापर्यंत या व्हिडिओला पूर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्सवर 4.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सचिन तेंडुलकरने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “निरळ आणि पाहण्यात आनंद आहे. झहीर खान, सुशीला मीना हिची गोलंदाजी तुझ्यासारखीच आहे. तु हे पाहिले आहे का?”
Smooth, effortless, and lovely to watch! Sushila Meena’s bowling action has shades of you, @ImZaheer.
Do you see it too? pic.twitter.com/yzfhntwXux— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 20, 2024
दरम्यान, भारताचा माजी स्टार गोलंदाज झहीर खान डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायचा आणि सुशीला देखील डावखुरी वेगवान गोलंदाज आहे. सचिननं शेअर केलेला व्हिडीओमध्ये पाहिल्यास सुशीलाची बॉलिंग अॅक्शन पाहताच क्षणी झहीर खान डोळ्यासमोर आल्यावाचून राहत नाही.
Smooth, effortless, and lovely to watch! Sushila Meena’s bowling action has shades of you, @ImZaheer.
Do you see it too? pic.twitter.com/yzfhntwXux— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 20, 2024
सचिनने हा व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. चाहतेही सुशीलाचे खूप कौतुक करत आहेत. एका चाहत्याने तर म्हटले की, भारतातील प्रत्येक गल्ली क्रिकेट टॅलेंटने भरलेली आहे.
‘आमलिया_ईश्वर’च्या इंस्टाग्राम अकाउंटनुसार, सुशीला मीना राजस्थानमधील प्रतापगड भागात राहते. सुशीलाचे क्रिकेटशी संबंधित इतर व्हिडिओही या अकाउंटवर उपलब्ध आहेत. सुशीला अनेकदा शाळांमधील क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना दिसते.
दुसरीकडे, जर आपण भारतीय दिग्गज झहीर खानबद्दल बोललो तर, तो एक स्विंग मास्टर म्हणून ओळखला जात होता, जो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यास सक्षम होता. त्याने 309 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 610 विकेट्स घेतल्या. कपिल देव यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज होता.





