मुंबई – धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ अजूनही लाखो चाहत्यांच्या दिल की धडकन आहे. माधुरी दीक्षित तिची जबरदस्त फिल्मी इनिंग खेळल्यानंत तिने डिजिटल जगात पाऊल ठेवल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माधुरीच्या आगामी ‘द फेम गेम’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आली होती.
माधुरीने नुकतेच मुंबईतील वरळी येथे १२.५ लाख रुपये प्रति महिना भाड्याने भाडेतत्त्वावर एक मोठा अपार्टमेंट घेतला असल्याची माहिती मिळते आहे. हे घर ५५०० स्क्वेअर फिटचे असून खूपच आलिशान आहे. हे अपार्टमेंट २९ व्या मजल्यावर आहे. सोशलवर मीडियावर माधुरीच्या या घराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. माधुरीच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिटीवर तिच्या चाहत्यांची नेहमी नजर असते. तर, माधुरीही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या आउटफिट्समधील फोटो पोस्ट करत असते.