नवी दिल्ली – विमानाला होत असलेल्या विलंबामुळे एका प्रवाशाने विमानातील कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रकार काल इंडिगो विमान कंपनीच्या विमानात घडला. याचवेळेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या विमानात हा प्रकार रविवारी घडला, त्याची क्लीप सोशल मिडीयावरही व्हायरल झाली आहे. या प्रवाशावर आता हवाई प्रवास बंदी लागू करण्यात आली आहे.
१४ जानेवारी इंडिगोच्या फर्स्ट ऑफिसरने विमानाला विलंब होत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करीत असतानाच त्याच्यावर या प्रवाशाने हल्ला केला असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.
A #passenger of a Indigo Flight, punched the captain who was making delay announcement#viralvideo #Indigo pic.twitter.com/snR3tRg4ST
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) January 15, 2024
इंडिगोने सांगितले की हा प्रवासी अनियंत्रित झाला होता. त्याला पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.