नवी दिल्ली – हरियाणवी डान्सर सपना चौधरीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सपनाने आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली होती. एक काळ असा होता सपनाला शोज मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती मात्र आज तिचे चाहते इतके वाढले आहेत कि पुढील सहा मी,अहिन्यांसाठी तिच्या शोजच्या तारखा मिळणं कठीण असल्याचं बोलल जात आहे. सपनाच्या एका चाहत्याचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये चाहता सपनाचे चक्क पाय धुवून ते पाणी पिताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सपनाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. सपनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सपनाचे पाय धुताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये सपना स्टेजवर बसलेली असून दोन लोक तिचे पाय धुताना दिसत आहेत.
सपनाचा हा अंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. यावेळी सपनाच्या पायावर दोघेजण पाणी ओतताना दिसत आहेत. तर कधी सपनाच्या पायावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करताना दिसत आहेत. एखाद्या धार्मिक अभिषेकाप्रमाणे यावेळी चाहते वागत असल्याने सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सपनाचे पाय धुवून झाल्यानंतर एक व्यक्ती माइकमध्ये बोलताना म्हणतो,यानंतर प्रसाद कोणी घेणार का.. सपना साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे कोणी प्रसाद घेणार का ? त्यांच्या गळयात आवाज देखील असा आहे.. त्या स्वतः सरस्वतीचा अवतार आहे. असं म्हणून ही व्यक्ती सपनाचे पाय धुतलेले पाणी एखाद्या तीर्थाप्रमाणे प्राशन करतो.
सोशल मीडियावर हा सर्व प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओची चांगलीच मजा घेताना दिसताहेत. अनेकांनी हे मार्केटिंग असल्याचे म्हंटले आहे. तर अनेकांनी सपनाला देवीची उपमा दिल्याने आक्षेप देखील नोंदवला आहे.