विकी कौशलने शनिवारी सतार वादनाची आपली हौस पुरवून घेतली. त्याने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सतारवर बाजीफ सिनेमातील ए वतन हे गाणे वाजवून आपल्या फॅन्सना आश्चर्यचकित करून टाकले. या सतार वादनाचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
सतार वाजवण्यासाठी बसलेल्या विकी कौशलने चक्क चिकनकरी कुर्ता घातला होता. त्याची बोटे सतारीच्या तारांवर लिलया फिरत होती. ए वतन, वतन मेरे आबाद रहे शुक्रीया हे गाण्याचे बोल देखील त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहेत. त्याचे हे कौशल्य अद्याप कोणालाच माहिती नव्हते. हा व्हिडिओ पोत्याच्या फॅन्सची वाहवा मिळवली.
सिनेसृष्टीतील त्याच्या फॅन्सबरोबरच गायक शंकर महादेवननेही विकीचे कौतुक केले आहे. आपण स्वतः जेंव्हा काही वाद्य वाजवायला शिकलो, तेंव्हा आपण वीणा वाजवायला शिकत होतो, अशी आठवणही शंकर महादेवनने सांगितली.
या व्हिडिओच्या आगोदर विकी कौशलने आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने स्वदेसमधील गाणे बॅकग्राऊंडला ऐकवून तिरंगा ध्वज फडकत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यालाही त्याच्या फॅन्सनी खूप चांगला प्रतिसाद दिला.