मुंबई – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. वत्सला देशमुख या अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत्या. वत्सला यांनी आपल्या करिअरची सुरुवात तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून केली. त्यांचे फायर’, नागपंचमी’, जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ असे अनेक चित्रपट गाजले होते.
पण सुहाग’ या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटातसुद्धा काम केलं होतं. आई, मावशी, काकू, आजी अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. वत्सला यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत वत्सला यांना श्रद्धांजली वाहिली.
वत्सला देशमुख यांच्यासारख्या हरहुन्नरी अभिनेत्रींच्या जाण्याने चित्रपटक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशा शब्दांत खोपकरांनी श्रद्धांजली वाहिली.
वत्सला यांनी पिंजरा’ या चित्रपटात आक्का’ही थोड्याफार प्रमाणात खलनायिकेकडे झुकणारी भूमिका साकारली होती. ही भूमिका सोडली तर त्यांच्या अभिनय प्रवासात त्यांनी सकारात्मक भूमिकाच साकारल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनावरही त्यांनी साकारलेल्या भूमिकांचा ठसा राहिलेला आहे.