Vaibhav Suryavanshi World Records : वैभव सूर्यवंशीचा कहर! फायनलमध्ये वादळी शतक झळकावत रचले तब्बल पाच ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
Vaibhav Suryavanshi World Records : अंतिम सामन्यातील या खेळीसह वैभव सूर्यवंशी आता अनेक विक्रम आपल्या नावावर करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Vaibhav Suryavanshi world records in U19 World Cup final : भारतीय क्रिकेटचा नवा उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कहर केला. त्याने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस पाडत इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहलं आहे.
अवघ्या १४ व्या वर्षी वैभवने केवळ ५५ चेंडूंत शतक झळकावून पाच जागतिक विक्रम रचत क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. या खेळीदरम्यान त्याने ८ षटकार आणि ८ चौकार ठोकले, म्हणजेच त्याने ८० धावा केवळ चौकार-षटकारांमधून वसूल केल्या.
वैभवने रचलेले ५ मोठे जागतिक विक्रम –
अंतिम सामन्यातील या खेळीसह वैभव सूर्यवंशी आता अनेक विक्रम आपल्या नावावर करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे:
१. सर्वात तरुण शतकवीर: अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण (१४ वर्षे ३१६ दिवस) खेळाडू.
२. सर्वात वेगवान शतक: अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमधील आजवरचे सर्वात (५५ चेंडूंत) वेगवान शतक.
३. एका सामन्यात सर्वाधिक षटकार: फायनलच्या एका डावात सर्वाधिक (१५) षटकार मारण्याचा विक्रम.
४. हंगामात सर्वाधिक षटकार: अंडर-१९ वर्ल्ड कपच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू.
५. षटकारांचे शतक: अंडर-१९ वन-डे क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा जगातील पहिला खेळाडू बनण्याचा मान वैभवला मिळाला आहे.
1⃣7⃣5⃣ runs
8⃣0⃣ balls
1⃣5⃣ fours & 1⃣5⃣ sixesA marathon knock by Vaibhav Sooryavanshi on a grand stage 👏👏
India U19 283/3 after 30 overs.
Updates ▶️ https://t.co/hisult7mtv #U19WorldCup pic.twitter.com/NL2r2ux1lT
— BCCI (@BCCI) February 6, 2026
फायनलमध्ये वैभवचा मोठा धमाका –
अंतिम सामन्यात सलामीवीर अरोन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाल्यामुळे भारत अडचणीत आला होता. मात्र, वैभवने कर्णधार आयुष म्हात्रेच्या साथीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. वैभवने ३२ चेंडूंत अर्धशतक आणि ५५ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याचा वेग इतका प्रचंड होता की, अवघ्या ७१ चेंडूंत त्याने १५० धावांचा टप्पा ओलांडला.
फायनलमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय ठरला –
वैभव सूर्यवंशीचे पाच जागतिक विक्रम
फायनलमध्ये शतक झळकावणारा तो केवळ तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी उनमुक्त चंद आणि मनजोत कालरा यांनी हा पराक्रम केला होता, मात्र वैभवचे शतक हे सर्वात वेगवान ठरले. या सामन्यात वैभवने ८० चेंडूंचा सामना १५ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या जोरावर तब्बव १७५ धावा कुटल्या.
इंग्लंड ‘फेव्हरेट’ शिकार!
वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्ध खेळायला विशेष आवडते, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अंडर-१९ वन-डे क्रिकेटमध्ये त्याने आपली सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा इंग्लंडविरुद्धच केल्या आहेत. हे त्याच्या कारकिर्दीतील चौथे आणि या वर्षातील दुसरे शतक आहे.





