Dinesh Karthik Statement : “वैभवसाठी नेहमी संजूचाच बळी का देता? अभिषेकलाही विश्रांती द्या”, पाचव्या सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकचं वक्तव्य
Dinesh Karthik Statement : दिनेश कार्तिकने म्हटले आहे की, जर भारताला पाचव्या टी-२० मध्ये वैभव सूर्यवंशीला खेळवायचे असेल, तर संजू सॅमसनला पुन्हा वगळण्याऐवजी अभिषेक शर्माला विश्रांती दिली पाहिजे.

Dinesh Karthik Statement Resting Abhishek Sharma To Fit Vaibhav Sooryavanshi In 5th T20I : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरून जोरदार चर्चा रंगली आहे. भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापनाला थेट सल्ला दिला आहे. कार्तिकच्या मते, जर निवड समिती आणि व्यवस्थापनाला १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात परत आणायचे असेल, तर प्रत्येक वेळी संजू सॅमसनचा बळी देण्याऐवजी अभिषेक शर्माला विश्रांती (Break) देण्याचा विचार केला पाहिजे.
तिसऱ्या सामन्यात तुफानी खेळी, तरीही चौथ्या टी-२० मधून वगळले –
भारताने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतरही ऑकलंडमधील चौथ्या टी-२० सामन्यातून वैभव सूर्यवंशीला बाहेर बसावे लागले होते. इशान किशनचे दुखापतीतून पुनरागमन झाल्याने वैभवचा पत्ता कट करण्यात आला. याआधी वेलिंग्टन येथील तिसऱ्या सामन्यात वैभवने अवघ्या १९ चेंडूंत ४५ धावांची वादळी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. औपचारिक उरलेल्या सामन्यांमध्ये या युवा फलंदाजाला अधिक संधी मिळण्याची अपेक्षा असताना त्याला अचानक बेंचवर बसवल्याने आश्चर्य व्यक्त झाले.
संजू आणि इशान अपयशी; ऑकलंडमध्ये भारताचा दारुण पराभव –
Dinesh Karthik suggests rotation strategy to fit Sooryavanshi and Samson together in India’s XI
Dinesh Karthik said:
“Because it is a game where we have won the series, I wouldn’t mind holding on to Axar and letting go of one of the pacers. I would go down the route of giving Arshdeep a break and using Mayank and Prince. Arshdeep has been outstanding as usual. He has been our best bowler in the series, and there is no harm in sitting him down to see what a spinner can do in these conditions.
I know the world will want Vaibhav to play. If they want to play Vaibhav, it has got to be in place of Abhishek, to give him a break, and that is how it should be. Every time there is anything related to Vaibhav, it is always Sanju. If you really want to fit in Vaibhav, Abhishek can take a break. The key word here is ‘break’.”
— Cricket Hub (@Anurag9793) October 31, 2026
चौथ्या लढतीत २६० धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी पत्त्यासारखी कोसळली. संजू सॅमसन अवघ्या ४ धावांवर, तर इशान किशन भोपळाही न फोडता बाद झाला. अभिषेक शर्माने २७ धावा केल्या, मात्र भारताचा संपूर्ण डाव १७२ धावांत आटोपला आणि संघाला ८७ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या अपयशानंतर अंतिम सामन्यासाठी संघात फेरबदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘नेहमी संजूचा बळी का?’; कार्तिकने उपस्थित केले प्रश्न
संघातील स्थानावरून कार्तिकने रोखठोक मत मांडले, “संपूर्ण जगाला वैभवने खेळावे असे वाटते. जर व्यवस्थापनाला वैभवला खेळवायचेच असेल, तर त्याला अभिषेक शर्माच्या जागी खेळवायला हवे. यामुळे अभिषेकला योग्य विश्रांती मिळेल आणि हाच योग्य मार्ग आहे. संघात वैभवचा समावेश करायचा असेल, तर नेहमी संजू सॅमसनचा बळी का दिला जातो. जर खरोखर वैभवला संघात खेळवायचे असेल, तर अभिषेकला ब्रेक देता येवू शकतो.”





