U19 World Cup 2026 : नुकतेच ICC ने १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषक २०२६ चं वेळापत्रक जाहीर केलं. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हि स्पर्धा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. या निर्णयावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडत, आयसीसीने यावेळी भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटात ठेवलं आहे, ज्यामुळे गट टप्प्यात संघ एकमेकांशी भिडताना दिसणार नाहीत. गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान सामने स्थगित करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र तरीदेखील आशिया चषक २०२५ खेळवण्यात आला आणि भारतीय संघाने तीन वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. तर महिलांच्या आयसीसी वनडे विश्वचषकातही भारत-पाक सामना झाला. त्यामध्येदेखील पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. The countdown begins ⏲️ The fixtures for the Men’s #U19WorldCup 2026 have been announced 🗓️https://t.co/34jVN6UZhv — ICC (@ICC) November 19, 2025 मात्र यावेळी आयसीसीने गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडत १९ वर्षांखालील विश्वचषकात दोन्ही संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ नामिबिया व झिम्बाब्वेमध्ये खेळवला जाणार आहे. हा वर्ल्ड कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला येत्या १५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. तर ६ फ्रेब्रुवारीला अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेतील १६ संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. यामध्ये भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. या गटामध्ये भारतासह न्यूझीलंड, बांगलादेश आणि अमेरिकेचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि अमेरिका यांच्यात झिम्बाब्वेच्या बुलावायो या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. अंडर-१९ विश्वचषक २०२६ मधील गट अ गट – भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अमेरिका ब गट – झिम्बाब्वे, इंग्लंड, स्कॉटलंड, पाकिस्तान क गट – ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान व श्रीलंका ड गट – टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका अंडर-१९ विश्वचषक २०२६ मधील भारतीय संघाचं वेळापत्रक १५ जानेवारी – भारत वि. अमेरिका – बुलावायो १७ जानेवारी – भारत वि. बांगलादेश – बुलावायो २४ जानेवारी – भारत वि. न्यूझीलंड – बुलावायो