Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडवर सर्जिकल स्ट्राईक! विश्वचषकाच्या फायनलमध्ये शतक ठोकत लावली विक्रमांची रांग
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतकी खेळी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Vaibhav Suryavanshi century record :भारतीय क्रिकेटचा नवा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक खेळी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या १४ वर्षांच्या या खेळाडूने फायनलच्या दडपणाखाली इंग्लिश गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. वैभवने केवळ शतकच झळकावले नाही, तर वयाचे आणि वेगाचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
अर्धशतक ते शतक… अवघ्या २३ चेंडूंचा प्रवास!
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर आरोन जॉर्ज स्वस्तात बाद झाल्यानंतर वैभवने डावाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळ करणाऱ्या वैभवने एकदा लय पकडल्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यान आपले अर्धशतक ३२ चेंडूत पूर्ण केले होते, तर पुढील ५० धावा त्याने अवघ्या २३ चेंडूत कुटल्या. अशाप्रकारे त्याने ५५ चेंडूंत आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार खेचले.
१४ व्या वर्षी विश्वविक्रम!
वैभव सूर्यवंशी आता अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. २ मार्च २०११ रोजी जन्मलेला वैभव आजच्या सामन्याच्या दिवशी १४ वर्षे ३१६ दिवसांचा आहे. इतक्या लहान वयात जगातील कोणत्याही फलंदाजाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करता आलेली नाही.
𝗛.𝗨.𝗡.𝗗.𝗥.𝗘.𝗗 💯
Cometh the hour, cometh Vaibhav Sooryavanshi 👏
He smashes a 55-ball century in the #U19WorldCup Final 🫡
Updates ▶️ https://t.co/hisult7mtv pic.twitter.com/vNZY4ZoLJ3
— BCCI (@BCCI) February 6, 2026
भारतासाठी सर्वात वेगवान शतक –
अंडर-१९ वर्ल्ड कप फायनलमधील सर्वात तरुण शतकवीर वैभव सूर्यवंशी
वैभवने भारतासाठी अंडर-१९ विश्वचषकात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये राज बावा याने ६९ चेंडूत शतक केले होते, वैभवने ५५ चेंडूत हा टप्पा गाठून नवा इतिहास रचला. एकूण विश्वचषकाचा विचार करता, ऑस्ट्रेलियाच्या विल मलाजचुकने (५१ चेंडू) या वर्षात वेगवान शतक केले आहे, पण फायनलमधील सर्वात वेगवान शतक आता वैभवच्या नावे आहे.
वैभवच्या फटकेबाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल –
सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध २२३ धावांच्या स्ट्राइक रेटने ६८ धावा करणाऱ्या वैभवने फायनलमध्ये आपली तीच आक्रमक लय कायम ठेवली. त्याच्या या फटकेबाजीमुळे इंग्लंडचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मैदानात केवळ चेंडूच्या मागे धावताना दिसले. वैभवच्या या शतकामुळे भारताने अंतिम सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. वैभवने ८० चेंडूंचा सामना १५ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या जोरावर तब्बव १७५ धावा कुटल्या.





