वैभव खेडेकरांचा पक्ष प्रवेश दुसऱ्यांदा लांबणीवर; दोन बड्या नेत्यांचा हात? तळकोकणात चर्चांना उधाण, ‘त्या’ Whatsapp Status ने वेधलं लक्ष

Vaibhav Khedekar : गेल्या काही दिवसांपासून तळकोकणातील राजकारण चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बडतर्फ केलेले वैभव खेडेकर हे चर्चेत आहेत. ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे, पण अद्यापर्यंत खेडेकरांचा अधिकृत पक्षप्रवेश झालेला नाही.
काल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डोंबीवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. खरंतर ते पक्ष प्रवेशासाठीच गेले होते पण याहेही वेळेस त्यांचा पक्षप्रवेश वेटिंगवर ठेववण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्या पक्षप्रवेश थांबवण्यामागे दोन स्थानिक बड्या नेत्यांची नावांची चर्चा तळकोकणात होत आहे.
डोंबिवलीत गेलेल्या वैभव खेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश न करताच माघारी फिरण्याची वेळ आली. अशातच त्यांनी व्हॅाटअॅपला ठेवलेल्या स्टेटस चर्चेचा विषय झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात बऱ्याच वेळ ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मै समंदर हू लौटकर जरुर आऊंगा’ हेच वाक्य वैभव खेडेकरांनी त्यांच्या व्हॅाटसॅप स्टेटसला ठेवलं आहे. यामुळे आता राजकारण आगामी काळात आणखी तापणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दोनवेळा भाजप प्रवेश रखडला
खरंतर मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर वैभव खेडकर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. याअगोदरच त्यांनी तसे सूतावोच केले आहे. त्यानुसार ४ सप्टेबर या दिवशी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार होता. मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर काही कारणामुळे पक्षप्रवेश झाला नाही. आता पुन्हा एकदा पक्षप्रवेश न झाल्याने विविध राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, वैभव खेडकरांनी डोंबवली येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कार्यकर्त्यांसह भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती आहे. यामुळे पुढे काय होतं ते पाहणे लागणार आहे.
हेही वाचा : “जनतेवर बॉम्ब टाकण्यातून वेळ मिळाला तर…”, क्षितिज त्यागी यांची UNHRC मध्ये पाकवर सडकून टीका





