प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करून भाजपने काय साध्य केलं?

BJP state president Ravindra Chavan : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार आणि भाजपचे कार्याध्यक्ष पद असलेले रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती करून भाजपने नेमंक काय साध्य केले आहे, याविषयी जाणून घेऊयात…
स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. मंगळवारी (१ जुलै २०२५) भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरळी येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अरुण सिंह यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
पक्ष नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घातली आहे. त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदी निवड करून भाजपने मोठा राजकीय डाव टाकला आहे. राजकीय जाणकारांच्या मते भाजपने कोकणात आपला जोर वाढण्याच्या दृष्टीने चव्हाणांवर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपला कोकणात आपला होल्ड वाढवायचा आहे.
मूळात रवींद्र चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ आणि संयमी नेत्याची असल्याने पक्ष नेत्वृताने त्यांना संधी दिली आहे. चव्हाण हे गेली चार टर्म डोंबिवली विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. जनमानसांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रंचड आहे. चव्हाण यांनी पक्षाच्या युवा मोर्चापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. त्यांनी राज्यमंत्री पदावर काम केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या खास मर्जीतल्या नेत्यांपैकी एक म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते.
राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यानंतर अनेकजण मंत्री पदाच्या रेसमध्ये होते. रवींद्र चव्हाण यांची देखील मंत्री मंडळात वर्णी लागेल असे बोलले जात होते. मात्र, तसे झाले नाही. त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली नाही, अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली. पण रवींद्र चव्हाण यांनी याविषय़ी नाराजी व्यक्त केली नाही. पक्ष देईल ती जबाबदारी असे म्हणत त्यांनी पक्षात काम केले. याचे फलित त्यांना मिळाले प्रदेशाध्यक्ष पदाच्या रूपाने मिळाले आहे.
भाजपात रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय दुसरा कोणताच नेता नसल्याने आपसूकच त्यांनी इतकी मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या नेत्वृवाखाली भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे. चव्हाण यांच्यामुळे भाजपला ठाण्यासह कोकण मुंबई भागात चांगला होल्ड निर्माण करता येऊ शकतो. तसेच शिंदेंना शह देण्यासाठी त्यांची निुयक्ती केल्याची चर्चा देखील होत आहे. त्यामुळे आता आगामी काळात स्थानिक पातळीवरील भाजपचा होल्ड अधिक मजबूत करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.





