राज ठाकरेंचे निष्ठावंत वैभव खेडेकर यांच्या हाती कमळ; आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश

Vaibhav Khedekar Join BJP | मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. खेडेकर आज (4 सप्टेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील. खेडेकर यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार आहेत.
खेडेकर यांचा भाजप प्रवेश मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते होते. खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र गेल्या काही काळापासून ते नाराज होते. काही कारणामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं.
त्यानंतर ते भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. Vaibhav Khedekar Join BJP |
वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया
भाजप प्रवेशाबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले होते की, “भारतीय जनता पार्टी ताकद देणार आहे. राज ठाकरेंसाठी माझ्या हृदयातला कोपरा आजही ओला आहे. मी राज ठाकरेंना हृदयातून नाही तर राज ठाकरेंनी त्यांच्या हृदयातून मला बाजूला केलं. माझ्यासोबत माझ्या सर्व समर्थकांची मला साथ आहे. यापुढे भाजपचं काम तेवढ्याच ताकदीने केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडतर्फ तिन्ही जिल्हाप्रमुख यांच्यासह सर्व समर्थक सोबत आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला कोणतही राजकीय बळ नाही, कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच मी आहे,” असं खेडेकर म्हणाले होते.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. हा निर्णय मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी जाहीर केला होता. Vaibhav Khedekar Join BJP |
हेही वाचा:





