V. D. Satheesan : केळकरांच्या नियुक्तीचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन; विरोधकांचे आरोप फेटाळले
केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन (V. D. Satheesan) यांनी मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू. केळकर यांची आपले सचिव म्हणून केलेल्या नियुक्तीचे जोरदार समर्थन केले आहे.

V. D. Satheesan : केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन (V. D. Satheesan) यांनी मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू. केळकर यांची आपले सचिव म्हणून केलेल्या नियुक्तीचे जोरदार समर्थन केले आहे.
निवडणुकांपूर्वी भाजप किंवा सीपीआय(एम) यांसह राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने केळकर यांच्यावर एकही आरोप केला नव्हता, याकडे मुख्यमंत्र्यांनी (V. D. Satheesan) प्रामुख्याने लक्ष वेधले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सतीशन यांनी स्पष्ट केले की, मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती एका प्रमाणित घटनात्मक प्रक्रियेद्वारेच होते, ज्यामध्ये राज्य सरकारने पाठवलेल्या पॅनेलधून मुख्य निवडणूक आयुक्त अंतिम निवड करतात.
यापूर्वीही नलिनी नेटो यांच्यासारख्या माजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गृह सचिव, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री (V. D. Satheesan) कार्यालयात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्याचा दाखला त्यांनी दिला.
केळकर यांच्या नियुक्तीवरून सीपीआय (एम) आणि भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर दुहेरी मापदंड स्वीकारल्याचा आरोप करत टीकास्त्र सोडले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले, जिथे निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केले होते; मात्र केरळमध्ये केळकर यांच्या विरोधात अशी कोणतीही तक्रार नव्हती, असे सांगत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.






